गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायत येथे पैनगंगा परियोजना विरूर(गाडेगाव)अंतर्गत दामिनी महिला मंडल वणी क्षेत्र यांच्या विद्यमाने सामाजिक दायित्व म्हणून 13 आक्टोंबर रोजी आर्थिक दृष्ट्या गरीब,विधवा,निराधार, अंध,अपंग,मूकबधिर लोकांना मास्क, सॅनिटायजर व बेडशीटचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय सिंग पैनगंगा परियोजना अधिकारी विरूर होते तर हिरापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद कोडापे,माजी उपसरपंच शिवाजी बोढे,तंमु अध्यक्ष दुर्योधन सिडाम,ग्रामसेवक ताजने,भारतबाबू चुक्का यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी अंदाजे 20 लाभार्थ्यांना मास्क,सॅनिटायजर, बेडशीटचे वाटपचे करण्यात आले.यावेळी वाघमारे गुरूजी,भास्कर विधाते, दत्ता डाहूले,विशाल पावड़े,अरूण काले,राजेन्द्र पाचभाई,सोमेश्वर जोगी,सूरज आत्राम, सुवर्णा सिडाम आदी उपस्थित होते.
हिरापूर येथे WCL(पैनगंगा)तर्फे मास्क, सॅनिटायजर, बेडशीट वाटप
Advertisements