वेकोलीमध्ये हजेरी लावणाऱ्या कामगार नेत्यांची पत्रकाराला घरात घुसून मारहाण

0
1544
Advertisements

घुगूस – कोल इंडियाचा उपक्रम म्हणजे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यामध्ये अनेक नागरिकांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी दिली, परंतु यामध्ये काम करणारे कर्मचारी युनियनचे नेते बनल्याने ते फक्त हजेरी लावण्याकरिता जात असतात हे कटू सत्य आहे.
घुग्गुस येथील संजय पडवेकर नामक पत्रकाराने कोळसा खाणीचे कामगार नेते हजेरी लावून घरी परत येताना या आशयाची बातमी प्रकाशित केली होती.
ती बातमी का प्रकाशित केली म्हणून वेकोली कामगार नेते सुनील बांदूरकर, सूरज धोटे व सुमेश रंगारी हे मद्यधुंद अवस्थेत पडवेकर यांच्या घरी पोहचले ती बातमी का प्रकाशित केली म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली.
त्यावेळी शिवसेना शहर प्रमुखांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न सुद्धा केला.
पडवेकर यांनी शिवसेना शहर प्रमुख घोरपडे यांना सोबत घेत घुगुस पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वेकोली मध्ये आजही अनेक कर्मचारी गलेलठ्ठ पगार उचलतात मात्र कामावर पूर्णवेळ हजर राहत नाही, हजेरी लावली की ते घरी जातात नंतर सुट्टीच्या वेळी पुन्हा कार्यालयात जाऊन हजेरी लावतात, रिकाम्या वेळात हे कर्मचारी नेतेगिरी करण्यात व्यस्त असतात, वेकोलीच्या व्यवस्थापक मंडळाने अश्याया नेत्यांवर कारवाई करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here