चंद्रपुर – महाराष्ट्र इमारत व कामगार कल्याणकारी मंडळ हे कामगारांच कल्याण करण्यासाठी बनविल्या गेलं होतं, या मंडळांतर्गत कामगार आर्थिक सहाय्य योजना, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा यासाठी निधी दिल्या जातो हा लाभ नोंदणीकृत संघटित व असंघटित कामगारांना दिल्या जात असतो.
परंतु मागील 7 ते 8 महिन्यापासून नोंदणीचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे, कोरोनाकाळ असल्याने सध्या नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
सध्या कामगार हे डबघाईस आले असून शासनाने सुद्धा या बाबीवर लक्ष दिले नाही.
कामगारांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने पुढाकार घेत सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन देत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
कामगारांना वेगळे कार्यालय देण्यात यावे, बांधकाम कामगारांना घरकुल योजनेत सामावून घ्यावे, सर्व कामगारांना कोरोना सहायता निधी देण्यात यावा, आरोग्यनिधी देण्यात यावी अश्या विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने पुढाकार घेतला आहे.
यावेळी संघटनेचे शाहिदा शेख, डॉ. सिराज खान, डॉ. अभिलाषा गावतुरे व कामगार वर्ग उपस्थित होता.
संघटित व असंघटित कामगारांच्या समस्येकडे लक्ष द्या – भूमिपुत्र ब्रिगेडची मागणी
Advertisements