मुस्लिमांचा, मुस्लिमांसाठी हक्काचा लढा…..!

0
272
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
संपूर्ण राज्यभर मुस्लिम आरक्षण आंदोलन समितीतर्फे मंत्री,खासदार,आमदार यांना मुस्लिम समाजाच्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक स्थिती अतिमागास झाली.असल्याचे चित्र न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉ.महेमदुररहमान समितीच्या अहवालात मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा विदारक चित्र समोर आला. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे मुस्लिम समाज दुर्लक्षित राहिल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मागासलेला आहे.यापूर्वी न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज नमूद केली मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज नेहमी अन्यायाचा बळी ठरला आहे.आज मुस्लिम समाजाची आर्थिक अत्यंत गंभीर असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागासलेपण असल्याने विकासाच्या प्रवाहापासून मुस्लिम समाज पिछाडीवर गेला आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री यांना मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावा शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी आश्रम शाळेच्या धर्तीवर मुस्लिम निवासी शाळा सुरू करण्यात याव्या सातत्याने समाजावर होणारे अन्याय अत्याचार अशा गंभीर घटनांवर आळा घालण्यासाठी ॲट्रॉसिटी मुस्लिम संरक्षण कायदा तयार करण्यात यावा सेवेमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा अत्यंत चिंताजनक असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावा याकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी सैय्यद आबीद अली,अॅड.शाकीर मलक,हाजी हारूण जावेद सिद्दीकी,अतीक कुरेशी, सुहेल शेख,नाजीर कुरेशी,शफी शेख, शकील शेख,शाहीन शेख,मल्लेका अंजुम, नफीसा,शिरीन कुरेशी,रजी़या सुल्ताना यांच्यासह महीला-पुरूष मोठ्यासंख्यने उपस्थित होते.निवेदन स्वीकारीत शासन स्तरावर आरक्षण मागणीचा विचार करू,मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहपासुन दूर ठेवता येणार नाही हे वास्तव्य खरे आहे.शासन विचार करेल मी आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा प्रयत्न करेन असा विश्वास दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here