यवतमाळ – महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे आणि मंदीर हे संस्कार, श्रद्धा तसेच विश्वासाच केंद्र आहे. संस्कृती टिकवण्यासाठी संतांनी लढा दिला. मात्र आज हीच संस्कृती संपविण्याचे पाप महाराष्ट्रातील आघाडी सरकार करीत आहे, हे आघाडी सरकार नसून बिघाडी सरकार आहे असा घणाघाती आरोप पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा केळापुर तालुका (जिल्हा यवतमाळ) तर्फे आयोजित महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी पांढरकवडा (जिल्हा – यवतमाळ) येथील गोपाळकृष्ण मंदिरा समोर लाक्षणिक उपोषण दरम्यान केला.
या लाक्षणिक उपोषणाला वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप जिल्हा सचिव किशोर बावणे, तालुका अध्यक्ष शंकर समृतवार, डॉ. अंगाईतकर, पांढरकवडा नगरसेवक बंटी जुवारे आदी पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील मद्य विक्री केंद्र सुरु करून मंदिर बंद करण्याचे धोरण म्हणजे “मंदिरावर मद्य भारी” असेच आहे. भारत हा मंदिरांचा देश आहे व देशातील मंदिरांची संस्कृती हीच आपली ओळख असतांना हे महाराष्ट्र सरकार आपली ओळखच संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र सरकारच्या धोरणांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावनांची हत्या होत आहे मात्र हे पाप भारतीय जनता पार्टी होऊ देणार नाही, आम्ही या साकारला नक्कीच टाळ्यावर आणू असा विश्वास यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
देशातील मंदिरांची ओळख हीच आपली संस्कृती
Advertisements