चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारुबंदीवर पुनर्विचार होणारचं – विजय वडेट्टीवार

0
1198
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीच्या मुद्द्यावरून समाजसेवक व राजकारणी यांच्यामध्ये काही दिवसांपासून शाब्दिक सामना रंगला आहे.
एका जिल्ह्यात दारूबंदी करायची व दुसरा जिल्हा सुरू ठेवायचा असं असेल तर ज्यांना दारूबंदी हटली न पाहिजे असे वाटत असेल तर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा अशी टीका आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आम्ही निवडणूक लढतो आम्हाला जमिनीवर काय चालते ते स्पष्ट दिसते परंतु जे निवडणूक कधी लढत नाही त्यांना यामधले काही समजणार नाही, दारूबंदीचा पुनर्विचार व्हावा या मताचा मी आहे, यावर समिती बनविण्यात आली आहे ती अहवाल देणार तेव्हा हे सर्व चित्र स्पष्ट होणारचं तो पर्यन्त समाजकारणी यांनी त्याचा विचार करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here