आघाडी सरकारच्या विरोधात भाजप रस्त्यावर

0
172
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपा महिला मोर्चा, युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले.या सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार,बलात्कार,विनयभंग,व हत्याकांड अशा घटनांची मालिकाच सुरू झाली आहे.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना सरकारने मौन धारण केले आहे.या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी कोरपना येथील बस स्टँड येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले.तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून महिलांच्या स्वरक्षणासाठी कठोर असा कायदा करण्याची मागणी वजा विनंती करण्यात आली आहे.
सदर आंदोलनाचे नेतृत्व कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांनी केले. संजय मुसळे,पुरुषोत्तम भोंगळे,अरूण मडावी, किशोर बावणे,अमोल आसेकर, विजय रणदिवे, ओम पवार,दिनेश खडसे,पद्माकर दगडी, रत्नमाला येवले, सिंधुबाई, पुष्पा आसुटकर, शकुंतला नवले, लिलाबाई,रूक्माबाई शेंडे,एजाज़ शेख,सुरेखा इंगोले,चांदबाई शेख,सुनिता मांदाडे,लक्ष्मी मेश्राम, शकुंतलाबाई, शोभाबाई, गयाबाई, वर्षाबाई आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here