अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, आरोपीला तात्काळ अटक

0
642
Advertisements

बल्लारपूर – राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे, महिला अत्याचारावर जोपर्यंत कडक कायदे अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत ही मानसिक विकृती समाजात जिवंत राहणारच.
बल्लारपूर शहरातील लोकमान्य टिळक वार्डात एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुला मांजर दाखवितो असे आमिष देत तिच्यासोबत अश्लील चाळे करायला लागला.
यावर मुलगी रडायला लागली असता त्या विकृत मानसिकता असलेल्या 25 वर्षीय राकेश निषाद याने त्या मुलीला 5 रुपये देत कुणाला सांगितले तर जीविनिशी ठार मारेल अशी धमकी दिली.
हा सर्व प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितला असता मुलीच्या आईने याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी तात्काळ राकेशला अटक केली.
पोलिसांनी आरोपी राकेशवर 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here