कोविड सेंटर असल्याने शिबिर रद्द

0
274
Advertisements

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने मुल, ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांची नोंदणी इत्यादी कामांविषयी शिबिर रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक जाधव यांनी केले आहे.

मुल येथील कर्मवीर महाविद्यालय येथे 15 ऑक्टोंबर रोजी शिबिर आयोजित केले होते मात्र त्याठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे शिबिर रद्द करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एन.एच महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे 22 ऑक्टोंबर रोजी होणारे शिबिर महाविद्यालय परीक्षा केंद्र असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. तर शरद पवार महाविद्यालय गडचांदूर येथे 29 ऑक्टोंबर रोजी आयोजित केले होते मात्र याठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे सदर शिबिर रद्द करण्यात आले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here