राजूरा विधानसभा क्षेत्राला लागला घनकचरा प्रकल्पाचा “भस्मासुर”

0
278
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राजूरा विधानसभा क्षेत्राला जणु घनकचरा प्रकल्पाचा “भस्मासुर”च लागला की काय अशी शंका निर्माण झाली आहे.गडचांदूर,कोरपना पाठोपाठ आता जिवती येथील नगरपंचायत येथे घनकचरा प्रकल्पात मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याची बोंब ऐकायला मिळत असून बोरकर यांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणानंतर जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली.अशीच परिस्थिती जिवती नगरपंचायतची असल्याचे आरोप करत त्याठिकाणी सुरु असलेली जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवा अन्यथा महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेतर्फे कठोर आणि कार्यात्मक पाऊल उचलण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शासनाकडून 14 वित्त आयोग निधीच्या माध्यमातून “घनकचरा” व्यवस्थापनाच्या कामांवर लाखोंची तरतूद केली जाते.मात्र सदर काम बऱ्याच ठिकाणी अंदाज पत्रकानुसार होत नसल्याने शासनाचा मुख्य उद्देशच सफल होताना दिसत नाही.जिवती नगरपंचायत मध्ये 3 हजार लोकांची वस्ती आहे.त्या वस्तीला नगराध्यक्षा,बॉडी व मुख्याधिकारी यांनी गेल्या 31जानेवारी 2020 ला 14 वित्त आयोगामध्ये जो डीपीआर मंजूर केला.त्यात 14 वित्त आयोग सामिल केला आहे.3 हजार लोकवस्तीला 45 लाख,58 हजार 550 एका वर्षासाठीचा कंत्राट आणि त्याच पद्धतीचा जिवती वरून 23 किमीच्या अंतरावर असलेल्या 45 हजार लोकसंख्येच्या गडचांदूरला 63 लाख,58 हजारच्या जवळपास इतका आहे.यात मोठ्याप्रमाणात घोळ असून जिवती येथे संगनमताने डीपीआर फुगवून बनवल्या आहे यात शंका नाही.याठिकाणी शासनाची दिशाभूल करत शासनाच्या तिजोरीला चुना लावला जात असून यावर शासनप्रशासनाने विचार करून जिवती नगरपंचायत येथील लोक वसाहत व लोकसंख्येच्या आधारावर नवीन डीपीआर तयार करून जूना डीपीआर व कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून परवाना काळ्या यादीत टाकावा तसेच येथील घनकचरा प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधीत अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, मनसे राजूरा विधानसभा प्रमुख महालींग कंठाळे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here