चंद्रपूर – महावीकास आघाडी सरकारच्या काळात महिला, तरुणी व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे मात्र वाढत्या महिला अत्याचारावर मुख्यमंत्री व गृहमंत्री साधी दखल घेत नाही म्हणून चंद्रपूर भाजपने सरकारला जागे करण्यासाठी निषेध आंदोलन केले.
या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला, महापौर राखी कंचर्लावार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत हे तीन तिघाडी सरकार महिलांच्याया संवेदना समजू शकत नाही, या सरकारचा निषेध आहे.
या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजेंद्र गांधी, खुशाल बोंडे, विजय राऊत, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा नेते प्रकाश धारणे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश तालेवार, यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपा महिला आघाडी (महानगर) चे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते.