वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

0
257
Advertisements

राजुरा – 10 निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतमजूर समन्वय समिती टेंबुरवाही तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाघाला तात्काळ जेरबंद करावे, मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी, परिवारातील सदस्यांना कंत्राटी कामावर सामावून घ्यावे, वन्य-मानव संघर्षातील दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अश्या अनेक मागण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला.
7 दिवसांच्या आत त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे वनविभागातर्फे आश्वासन मिळताच आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आमदार सुभाष धोटे, अविनाश जाधव, चेतन जयपूरकर, बापूराव मडावी, दीपक मडावी, घनश्याम मेश्राम आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here