किसान युवा क्रांती संघटनेची कार्यकारिणी गठीत

0
304
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील शासकीय विश्रामगृहात “किसान युवा क्रंती संघटनेची” सभा आयोजित करण्यात आली.तालुक्यातील प्रत्येक गावागावात संघटनेचा विस्तार व्हावं या उद्देशाने शेतकरी मित्र मंडळींसोबत चर्चा करून पद वितरण करण्यात आले. “आपली संघटना कशा प्रकारे व काय काम करते तसेच कुणासाठी काम करते याविषयी सखोल मार्गदर्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीपद भारती यांनी केले.” पिंपळगाव,लखमापूर, अंतरगाव,खिर्डी,नांदाफाटा येथील काही समाज हितचींतकाना किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करता यावे यासाठी पदभार देत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.यावेळी सदर संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीपाद भारती,उपाध्यक्ष समर्थ जोगी,उपाध्यक्ष इम्रान शेख, आकाश गेडाम,प्रवीण आदे,युवराज उरकुंडे,तिरुपती पेटकर,प्रफुल मांडवकर, राहुल मुक्के,सचिन गोहकार,सचिन राजूरकर,निलेश चौथाले,दिनेश बोधाले, अनिकेत बोभाटे,वैभव बोभाटे,सूरज गेडाम,सागर केलझरकर इत्यादींची उपस्थिती होती.कोरपना,जिवती व राजूरा तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये किसान युवा क्रांती संघटनेचा विस्तार करून शेतकरी राजांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू,असे मत तालुकाध्यक्ष भारती, उपाध्यक्ष समर्थ जोगी आणि इम्रान शेख यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here