दोन तालुक्याला जोडणाऱ्या “लालपरी” च्या फेऱ्या बंद

0
709
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या संसर्गापासून लोकांना वाचविण्यासाठी शासनाकडुन “घरी रहा,सुरक्षित रहा” अशाप्रकारे आवाहन करण्यात आले.गेल्या सहा महिन्यापासून सतत कधी लॉकडाऊन तर कधी जनता कर्फ्यूची मालिका सुरू होती.आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.लॉक ते अनलॉककडे वाटचाल सुरू झाली असून लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी बसेसची वाहतुक सुरु करण्यात आली असताना राजूरा आगाराने अजूनही यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वणी येथे पुर्वी सुरू असलेली लालपरी सुरू केलेली नाही. राजूरा,कोरपना विशेषतः गडचांदूर येथे मोठ्याप्रमाणात यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वास्तव्यास आहे.कित्यकांचे नातीगोती जोडलेली असल्याने बसद्वारे सतत ये-जा करावे लागते.मात्र बस सुरू नसल्याने या प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुर्वी सकाळी 7/30 च्या दरम्यान राजूरा वरून वणी साठी बस सुरू होती आणि लगेच वणी वरून परत फिरायची मात्र आता बंद असल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहे.वणीकडे जाणाऱ्या एका प्रवासी व्यक्ती सोबत चर्चा केली असता “साहेब राजूरा-वणी बस पूर्ववत सुरू करायाला सांगाना” अशी हाक क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे News34 च्या माध्यमाने केली आहे.आता आमदार साहेब याच्या हाकेला कितपत साद देतात याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here