युवकांचा आम आदमी पक्षाकडे कौल

0
323
Advertisements

चंद्रपूर – दि. ११/१०/२०२० रोज रविवारला आंबेडकर चौक येथिल पार्टी कार्यालयात आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर चे शहर सचिव राजु कुडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळेला बाबुपेठ मधील स्थानिक उच्च शिक्षित युवकांनी आप मध्ये प्रवेश घेतला.. यावेळेस आप चे शहर सचिव यांनी दिल्ली चे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये जनहिताचे असंख्य ऐतिहासिक कामे होत आहे त्याच पद्धतीने आपल्या चंद्रपूर शहरात अमुलाग्र बदल घडवून आणायचा असल्यास भ्रष्ट्राचार विरोधी आम आदमी च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या आम आदमी पार्टी शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळेस आप चे झोन ३ चे संयोजक सुखदेव दारूंडे, विशाल भाले, अविनाश दसुडे, संदेश खडसे, कोमल कांबळे, रोहित मालेकर, जयंत थूल, दीपक उंदिरवडे, बाबाराव खडसे, योगेश आत्राम, शुभम तळसे, नमेश भडके, अनुप तेलतुंबडे असे अंसख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here