चंद्रपूर – दारू पिणाऱ्याला न सांगता दारू सोडवा हे स्लोग्न आहे व्यसनमुक्ती केंद्राचे परंतु आज पर्यंत किती लोकांनी दारू सोडली? त्यानंतर त्यांनी कधी दारू घेतली का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतील परंतु सत्य काही वेगळंच आहे.
आज कोट्यवधी लोकांना दारूचं व्यसन आहे, कुणाला व्यसन तर कुणाला स्टँडर्ड परंतु याला सुध्दा आटोक्यात आणता येत पण कसे ते म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन.
तिथे गेल्यावर एकदा दारू सोडली की पुन्हा तो इसम दारू घेणार की नाही हे मात्र शक्य नाही.
चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात 2015ला दारूबंदीची घोषणा करण्यात आली मात्र त्याआधी किती नागरिक या व्यसनातून मुक्त झाले याचा आकडा कुणाकडेच नाही.
दारूबंदी जिल्ह्यातील जप्त दारू, किती आरोपींना आजपर्यंत अटक करण्यात आली त्याचा आकडा मात्र सहज उपलब्ध होतो.
सध्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे जोर लावत आहे.
मात्र आता सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचं नाव डॉ. प्रकाश आमटे व महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांनी वडेट्टीवारांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
सामाजिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींचे मत त्यांच्या जागी बरोबर आहे परंतु त्या दारूबंदीचे किती नुकसान झाले आहे याचा सध्या त्यांना विचार करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आता मोहल्ला कमिटी नेमून सर्वांना दारूविक्रीसाठी एक गाव दिल्या गेले आहे, त्यांच्याशिवाय दुसरा कुणी व्यक्ती त्या गावात दारूविक्री करू शकत नाही.
जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर येत आहे, परंतु जेव्हा कायद्याची अंमलबजावणीची गरज असते त्यावेळी मात्र हे सामाजिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती काही बोलत नाही असं का?
विरोध हा चुकीच्या गोष्टीला नेहमी करायलाच हवा पण ती चूक का होत आहे याचा विचार सुद्धा करण्याची गरज आहे.
दारुबंदीमुळे नागरिकांचे रोजगार गेले त्यांचं पुनर्वसन सुद्धा करण्यात आले नाही.
दारूबंदी होण्याआधी व्यसनमुक्ती केंद्राने किती नागरिकांना या व्यसनातून मुक्त केले? जर त्यांनी दारूबंदी होण्याआधी नागरिकांना या भयावह व्यसनापासून मुक्त केले असते तर आज नागरिक या अवैध दारूच्या आहारी गेले नसतेच.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचे आकडे दिसतात पण व्यसनमुक्तीचे का नाही?
Advertisements
Sir,
Tumcha ha article mala khup awadla. Khup chan prashn tumhi vicharla ahe. Tya prashnache uttar ya samaj sevi karyakartyanna dyaylach have. Aani daru bandi hi ek khup ghod chuk keli ahe.