महिला व अल्पवयीन मुलीला मारहाण

0
746
Advertisements

घुगूस – महिला अत्याचारात देशात वाढ होत असल्याने केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
जोपर्यंत कडक महिला अत्याचारावर कडक कायदे येणार नाही तोपर्यंत अत्याचार कमी होणार नाही.
अत्याचार झाल्यावर सुद्धा पोलीस मात्र महिला अत्याचार प्रकरणात हयगय करतात, असेच एक उदाहरण घुगूस येथे समोर आले आहे.
नाजमा बेगम सिद्दीकी नामक महिला सकाळी घरासमोर कपडे धुत असताना अवैधधंदे करणाऱ्या नौशाद कुरेशी यांनी क्षुल्लक कारणावरून त्या महिलेला मारहाण केली, इतकेच नव्हे तर त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीला सुद्धा मारहाण केली.
यानंतर त्या महिलेने कुरेशी विरोधात तक्रार केली मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली, खरं म्हटलं तर कुरेशी वर 354 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता, परंतु तसे काही झाले नाही कारण कुरेशीवर अनेक वर्षांपासून कोळसा तस्करी व भंगार चोरीचे गुन्हे दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here