चंद्रपूर – खासदार बाळू धानोरकर यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची लूट थांबविण्यासाठी प्रशासनासोबत बैठक घेत रुग्णांची लूट थांबविण्यात यावी अश्या सूचना केल्या होत्या.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या बघता आरोग्य विभागाने चंद्रपूर शहरातील 16 खाजगी रुग्णालय अधिग्रहित केले होते मात्र कोरोनाच्या नावावर काहींनी रुग्णांची लूटमार सुरू केली.
अश्या अनेक तक्रारी खासदार धानोरकर यांना मिळत होत्या, खाजगी रुग्णालयात सुरू असलेली अँटिजेन चाचणी मध्ये सुद्धा घोळ होत असून नागरिकांची लूट होत होती, खाजगी मध्ये अहवाल पॉझिटिव्ह मात्र तोच अहवाल शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह येत होता.
खासदार धानोरकर यांनी खाजगी रुग्णालयातील चाचणी केंद्र बंद करण्याचे निर्देश दिले.
कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्याकडून 500 रुपयांच्या पीपीई किटचे बाराशे ते पंधराशे रुपये आकारण्यात येत आहे.
नागरिकांची ही लूट थांबवून शासनाच्या दराने खाजगी रुग्णालयांनी कोरोना बाधितांवर उपचार करावे व सिटी स्कॅन चे दरपत्रक रुग्णालय परिसरात लावावे अशी मागणी खासदार धानोरकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली.
मनपाच्या पथकाने जादा बिल आकारणाऱ्या मानवटकर हॉस्पिटलवर 42 हजारांचा दंड ठोठावला आहे.