चिमूर : निरोगी आयुष्य जगायचे असेल तर “स्वच्छता” हीच खरी औषध होय. म्हणून सार्वजनिक स्वच्छतेसह वैयक्तिक नीटनेटकेपणाकङे थोर महात्म्यानी जनजागृतीच्या माध्यमातून लक्ष वेधले. राष्ट्रसंतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमीत मात्र खुद्द प्रशासनच गाफिल झालाय. कोरोनाच्या महामारीत पर्सनल प्रोटेक्शन अर्थात पीपीई कीट कचरापेटीत फेकून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुढे आणलाय. नगर परिषद मुख्याधिकारी नियम बजावण्यात असमर्थ ठरले की काय, असा सवाल विचारला जातोय.
आज सर्वत्र कोरोना या रोगाची महामारी सुरू आहे. या महामारी मध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून संसर्गजन्य रोग म्हणून या रोगाची ओळख आहे. मग असे असतांना प्रभाग क्रमांक.१० येथील १६०० इतकी लोकसंख्या आहे.आणि या कचरा पेटी लगत नेहरू शाळा , जिल्हा परिषद कन्या शाळा अशा २ शाळा संपर्कात येतात. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ये कोरोना ये..कोरोनाला आग्रहाचे निमंत्रण
Advertisements