चंद्रपूर – संपुर्ण भारतात विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीने देशव्यापी शांततापूर्ण तीव्र निषेध आंदोलन करणयात आले. हाथरस येथील पीडित मुलीला तसेच भारतातील विविध राज्यात दलित व मागासवर्गीय समाजातील निष्पाप मुलींवर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराचा निषेध करण्याकरीता चंद्रपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारच्या बेजबाबदार कृत्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे,सर्व प्रकरणातील आरोपींना फाशी ची शिक्षा घ्यावी,सर्व राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, मागील काळात पिंपरी चिंचवड मध्ये २२ वर्षाच्या तरुणावर जातीयवादी लोकांनी हल्ला करून ठार केले, परभणी ,नागपुर जिल्हात पण हल्ला करण्यात आले आहे.
ह्या सर्व प्रकरणातील पीडितांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संपुर्ण भारतातील विद्यार्थ्यांनी शांतात पूर्ण तीव्र निषेध करणयात आले. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टामध्य सुद्धा या सर्व प्रकरणात न्याया मिडण्यासाठी पिंटेशन फाईल करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरात ही रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन च्या पुढाकाराने सर्व समावेशक विद्यार्थी आंदोलन करणयात आले.या आंदोलनात सर्व महाविद्यालयातील युवक-युवतीचे मोठ्या संखेने सहभाग होता.
हयात रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन राष्ट्रीय। अध्यक्ष राजस खोबरागडे, कृती एकयाडेमी चे श्रिकांत साव सर, बि.आर.एस.पी. जिल्हा अध्यक्ष मोटु मानकर, सामाजिक कार्यकर्ता दिलिप खाकसे, प्रेरण कर्मरकर , रिपब्लिकन स्टुंडट फेडरेशन शहर अध्यक्ष संघपाल सरकटे, शोहेब शेख, सुरभी मोडक, लुम्बिनी गणवीर, रंजिता गजरे, शुभम शेंडे, हर्शल खोबरगड़े, रोहित थावरे, विनोद वाघमारे, शोलेश खोबरागडे, सुशिल मून, रोहित खोबरगड़े, पूनम आमते, श्रावस्ती तावाडे, प्रतीक मेश्रम, मोंटू देव, यश सिरसाट, कपिल गणविर, अमोल शेंडे, आदि उपसतित होते .
पीडितांना न्याय मिळण्याकरीता सर्व देशव्यापी विद्यार्थी संघटना रस्त्यावर – राजस प्रविण खोब्रागडे
Advertisements