Advertisements
चंद्रपूर/गडचिरोली – दारूबंदीच्या मुद्द्यावर सध्या समाजकारणी व राजकारणी मध्ये चांगलाच सामना रंगला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा जणू विडा उचलला कि काय असे चित्र सध्या दिसत आहे.
१९९३ पासून गडचिरोली व २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली होती, आज २७ वर्षांपासून गडचिरोली मध्ये दारूबंदी कायम आहे, व चंद्रपूर जिल्ह्यात ५ वर्षांपासून दारूबंदी आहे.