बाबूपेठ येथे अंगणवाडी केंद्र सुरू करा – बगुलकर यांची मागणी

0
160
Advertisements

चंद्रपूर – हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रभाग क्र 16 मधील बाबूपेठ परिसरात सर्वेक्षणानुसार प्रभागातील महर्षी कर्वे वार्ड,मराठा चौक परिसर, क्रांती चौक परिसर, कामगार चौक परिसर, यादव वस्ती परिसर, बंगाली कॉलनी दुर्गा मंदिर परिसर, अश्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहेत. या परिसरात स्तनदा माता, गरोदर माता, 0 ते 3 व 3 ते 6 वयोगटातील बालके, किशोरवनीय युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगणवाडी अभावी सर्व पात्र लाभार्थ्यांना अंगणवाडी मार्फत शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून आणि पोषण आहारापासून वंचित रहावे लागत आहे. हा परिसर संपूर्ण झोपडपट्टी व मजूर वर्गाचा आहे.

अंगणवाडी हा आरोग्य दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. म्हणुन विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत नगरसेविका व झोन सभापती सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्यातर्फे आमदार श्री सुधारभाऊ मुनगंटीवार व जिल्हा महिला बालविकास अधिकारी, चंद्रपुर यांना निवेदनपञ देऊन मागणी करण्यात आली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here