दारूबंदीच्या मुद्द्यावरून समाजसेवक विरुद्ध राजकारणी सामना

0
1507
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका असे पत्रच लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलं आहे. सध्या पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा बाळ हट्ट सुरु केला आहे. म्हणून या दारूबंदीच्या वादात डॉ आमटे यांना उडी घ्यावी लागली.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ ला, चंद्रपूर जिल्ह्यात २०१५ ला दारूबंदी करण्यात आली, दारूबंदीला माझे पूर्ण समर्थन आहे राज्य शासनाने गडचिरोली व चंद्रपूरची दारूबंदी कायम ठेवावी अशी विनंती सुद्धा त्या पत्रात करण्यात आली आहे.

Advertisements

शासनाने दारूबंदी केल्यावर ग्रामीण भागातील नागरिकांनी दारूमुक्तीचा संकल्प करीत अवैध दारू विषयी बंड पुकारले, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यावर जिल्ह्याच्या सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणे थांबले आहे. म्हणून दारूबंदी उठविण्याची काही गरज सरकारला नाही आहे. या दारूबंदी मध्ये अवैध दारू थांबवायची असेल तर कडक कायदे करून प्रभावी अमलबजावणी करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here