युवा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या युवांची व संस्थांची माहिती सादर करा

0
324
Advertisements

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवा संस्था यांनी मागील 5 वर्षात वर्षनिहाय केलेल्या ठळक व उल्लेखनीय कार्याची संक्षिप्त माहिती, कोविड-19 बाबत केलेले उल्लेखनीय कार्य व शासनाच्या योजना राबविण्याबाबत त्यांचा सहभाग असल्यास त्याबाबतची माहिती दि.13 ऑक्टोंबर 2020 पर्यंत सादर करावी, तसेच अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी केली आहे

           क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे युवा तसेच प्रत्येक जिल्ह्यात कार्य करणाऱ्या युवकांचे कार्य फक्त त्या ठराविक जिल्हा पुरते मर्यादित न राहता त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना अवगत होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यामध्ये युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांचे कार्य अधिकाधिक प्रकाशात आणण्याकरीता त्यांना रेडिओ, एफएम, सह्याद्री वाहिनीद्वारा मुलाखतीतुन प्रोत्साहन  देण्याची गरज आहे. तरी युवा क्षेत्रात युवांशी निगडीत केलेले कार्य, समाज उपयोगी केलेले कार्य, संकटसमयी केलेल्या उपाययोजना, बेटी पढाव, बेटी बचाव, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून तसेच इतर मार्गाने केलेले कार्य, आरोग्यासंदर्भात केलेले कार्य, शिक्षण क्षेत्राशी निगडीत केलेले कार्य, सामाजिक क्षेत्राविषयी केलेले कार्य इ. अनुषंगिक कार्यात नावलौकीक मिळविलेल्या युवांची  व युवा संस्थांची त्यांनी केलेल्या ठळक व उल्लेखनिय कार्यासह संपूर्ण माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मागविण्यात आलेली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here