गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील मुरली इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड “दालमिया” सिमेंट कंपनीत कामगारांची भरती सुरू आहे.याठिकाणी स्थानिकांना प्रथम संधी द्यावी याच बरोबर इतर मुद्यांना घेऊन शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड यांच्या नेतृत्वात सदर कंपनी व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.”कंपनी मध्ये जूने कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,स्थानीक तरूणांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,ज्यांच्या जमिनी कंपनीत गेल्या त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,मागणी नुसार पाहीजे असे कामगार स्थानिक पातळीवरचेच घेण्यात यावे,स्थानिक ठेकेदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे” सर्वप्रथम स्थानिक म्हणजे ज्याठिकाणी कंपनी अस्तित्वात आहे अशा नारंडा येथील लोकांना,त्यानंतर कोरपना तालुक्यातील लोकांना,त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना प्रथम प्राधान्य द्यावे.जर आपल्याला मागणीनुसार स्थानिक जिल्हा पातळीवर कुठलेही कामगार मिळाले नाही तरच आपल्या महाराष्ट्र,विदर्भातील मराठी तरुणांना प्रथम संधी द्यावी तसेच फक्त आणि फक्त कंपनीत मराठी ठेकेदारांनाच प्राधान्य देण्यात यावे.मुख्य म्हणजे कंपनीत घेण्यात येणाऱ्या कामगारांमध्ये 65 टक्के जूने कर्मचारी व कामगार आणि 35 टक्के नवीन मराठी बेरोजगार,कर्मचारी व कामगारांना संधी देण्यात यावी.यासर्व विषयांवर आपण लक्ष व काळजीपूर्वक तोडगा काढुन सदर विषय निराकरण करावे अन्यथा जिल्हा शिवसेना व युवासेनातर्फे कंपनीच्या विरोधात उग्र असा आंदोलन उभारण्यात येईल आणि होणार्या परिणामास मुरली इंडस्ट्रीज दालमिया सिमेंट प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी धनंजय छाजेडसह युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रणित अहिरकर, गडचांदूर शिवसेना शहर प्रमुख अक्षय गोरे,युवासेना तालुका प्रमुख अंकुश वांढरे, दिलीप पोटदुखे,अविनाश मेश्राम यांची उपस्थिती होती.
स्थानिकांना प्रथम संधी द्या, अन्यथा उग्र आंदोलन
Advertisements