अवैद्य धंदे व मवाल्यांना लावतात मसका, सामान्यांवर मात्र कायद्याचा धसका

0
634
Advertisements

गणेश लोंढे/नांदा फाटा
“सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हे महाराष्ट्र पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य.परंतू गडचांदूर पोलिसांनी जणु याला तिलांजली दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.”अवैध धंदे व मवाल्यांना लावायचा मस्का आणि सर्वसामान्यांवर उभारायचा कायदेचा धसका” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जर कुणी सामान्य नागरिक पोलिस ठाण्यात गेलं तर त्याला अगदी उलटाच अनुभव येत असल्याचे उदाहरण समोर आले आहे.अन्यायग्रस्त व्यक्ती माहिती देतात मात्र पोलिस आरोपी आणि फिर्यादी या दोन पक्षातील जो अधिक पैसेवाला असतो त्याची पैरवी करताना असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.अशावेळी ज्याच्यावर अन्याय झाला त्यांचा पोलिसांविषयी नकारात्मक मत बनल्या शिवाय राहत नाही.
सध्या गडचांदूर पोलिस ठाणेंनर्गत येणाऱ्या परिसरात अवैद्य धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला आहे.अवैद्य धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा धाकच उरलेले दिसत नाही.रामभरोसे सुरू असलेली वाहतूक व्यवस्था,अवैद्य दारू तस्करी व विक्री,सुगंधित तंबाखु विक्री,कोंबडा बाजार,सट्टापट्टी,जुगार अशा एकना अनेक अवैद्य धंदे करणाऱ्यांनी प्रत्येक गावात आपले पाय पसरविले आहे.
नांदाफाटा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच हे सर्व काळे धंदे राजरोसपणे सुरू आहे.तर इतर ठिकाणांची कल्पनाच न केलेली बरी असे मत अनेक सुज्ञ नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.नांदाफाटा चिकन मार्केट,पोलिस चौकीच्या मागे शांती कॉलनी,रामनगर बिबी,आवाळपूर रोड,पेट्रोल पंप समोर,कामगार नगर,नथ्थु कॉलनी,नांदाफाटा परिसर येथे बिनधास्त व सर्ससपणे दारू विक्री होत असल्याचे पहायला मिळत असून सुगंधित तांबखुची ज्यादा दराने बेभाव विक्री होत आहे.याबाबतची भणक पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना नसेल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.एखादी कारवाई झाल्यास मोठी रक्कम घेऊन सर्वकाही सेटिंग होत असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अवैद्य दारू तस्करी व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात काही नवीन पथक नेमल्याची माहिती आहे मात्र नांदाफाटा येथे अर्ध्या रात्री दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे लगतच्या वणी तालुक्यातील कैलासनगर इथुन दारूची तसस्करी होत आहे.मात्र दारूचे ते नवीन पथक गडचांदूर हद्दीत का नाही?अशी विचारणा नागरिक करत आहे.
जेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच पथक येऊन नांदाफाटा हद्दीतील सट्टापट्टी चालकांवर कारवाई करतात तर येथील पोलिस काय करतात असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.येथे सूरू असलेल्या सट्टापट्टी व इतर व्यवसायामूळे काही भ्रष्ट पोलिसांची चांदीच चांदी असल्याचे दिसते कारण ज्यांच्यावर तीन ते चार वेळा कारवाई करून सुद्धा यांनी पुन्हा आपले डोके वर काढल्याने या अवैद्य धंदे करणाऱ्यांना नेमके अभय कुणाचे हे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यात अवैद्य धंद्याच्या वाद,गुन्हेगारी वाढलेली असतांना गडचांदूर पोलीस माफिया राज हटविण्यास असमर्थ ठरत आहे का हा आसा प्रश्नही अनेकांना पडला आहे.भविष्यात हे असेच चालले तर सर्व सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल
जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे व माफिया राज होऊ नये यासाठी प्रयत्न करावे अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here