एन. एस. यू. आय चंद्रपूर विधानसभा कार्यकारिणी गठित

0
532
Advertisements

चंद्रपूर :- जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन खासदार धानोरकर यांनी केले. ते एन ए सी यु आय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी पंकज चिमुरकर विधानसभा अध्यक्ष चंद्रपूर, प्रणय साठे जिल्हा सचिव, कार्तिक सामृतवार शहर सचिव, दिल राज बेन्स विधानसभा सचिव, शुभम कार्लेकर विधानसभा सचिव, निहाल शेख जिल्हा उपाध्‍यक्ष यांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, एन एस यु आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांची उपस्थिती होती.

Advertisements

एन एस यु आय अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी समाजातील विविध समाजातील युवकांना राजकीय व्यासपीठ मिळण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षसंघटन व प्रत्येक समाजातील युवकांना हक्काचे राजकीय व्यासपीठ मिळण्याकरिता त्यांनी शेकडो युवकांना एन एस यु आय च्या माध्यमातून जोडले आहे.
पुढील काळात मोठ्या पदावर एन एस एस यु आर च्या माध्यमातून करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाचे विविध पदे दिली जाईल असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here