राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परिक्षाउपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू

0
178
Advertisements

चंद्रपूर,दि.9 ऑक्टोंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020 चंद्रपूर मुख्यालयाचे ठिकाणी दिनांक 11 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत 13 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत  100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यासाठी कलम 144 लागू असणार आहे, याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमीत केलेला आहे.

दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पुर्व परिक्षा 2020 परिक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरांतर्गत परिक्षार्थी व्यतिरिक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमा होणार नाही.

Advertisements

सदर परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रांतर्गत सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020 मधील परिक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

आदेश या परिक्षा उपकेंद्रांना लागु राहील:

विद्या विहार हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमो. हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय घुटकाळा वार्ड चंद्रपूर,  भवानजीभाई चव्हाण हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर, जनता विद्यालय पाण्याच्या टाकीजवळ चंद्रपूर,  सेंट मायकेल इंग्लीश स्कूल नगिनाबाग चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, चंद्रपूर,  एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर,  नेहरु विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर,  जनता महाविद्यालय सिव्हील लाईन चंद्रपूर, श्री.साई पॉलीटेक्नीक नागपूर रोड चंद्रपुर,  मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कुल या उपकेंद्राला आदेश लागू असणार आहे.

सदर आदेश दिनांक 11 ऑक्टोंबर  2020 रोजी चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पुर्व परिक्षा – 2020 चे परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here