राज्य घडामोडी – हिवाळ्यात कोरोना संक्रमण पुन्हा वाढणार असा धोक्याची सूचना एम्सचे डॉ रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली बाधितांची संख्या बघता अजून धोका टळला नाही असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले. जर प्रदूषणात वाढ वाढ झाल्यास कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढणार असल्याची प्रतिक्रिया डॉ गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.
प्रदूषणाचा स्तर २.५ पुन्हा वाढल्यास कोरोना बाधितांची संख्या ८ ते ९ टक्क्यांनी वाढू शकते, प्रदूषण वाढल्यामुळे फुफ्फुस व श्वसनाचे आजार पुन्हा उदभवू शकतात, म्हणून नागरिकांनी हिवाळ्यात आपली काळजी घ्यावी असे आवाहन डॉ गुलेरिया यांनी केले आहे.
या काळात जर वायू प्रदूषण कमी झाले तर हा आजार जास्त दिवस आपले पाय पसरवू शकणार नाही. हवा आणि प्रदूषणाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो आणि कोरोना सुद्धा आधी फुफ्फुसांवर आक्रमण करीत असतो म्हणून नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टनसिंग चा वापर यावर रामबाण उपाय आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणात हा विषाणू सहज पसरू शकतो, हिवाळ्यातच श्वसनासंबंधी समस्या निर्माण करणारे विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. वयक्तिक स्वच्छता, मास्क व सोशल डिस्टनसिंग चा वापर केल्यास आपण या विषाणू पासून स्वतःचा बचाव करू शकतो.
पुढच्या महिन्यात देशात मोठ्या प्रमाणात सण, उत्सवाचे दिवस आहे, आपण हे सण गर्दी टाळून साजरे करावे.