चंद्रपुर शहरातील सर्व अभ्यासिका व ग्रंथालये त्वरित सुरु करावी – ABVP चंद्रपूर

0
147
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे वैश्विक संकट आलेले आहे.सामाजिक व्यवस्था सोबतच शैक्षणिक प्रणाली पूर्णतः ठप्प झालेली आहे.यामुळे बऱ्याच कालावधी पासुन मनपा क्षेत्रातील सर्व अभ्यासिका व ग्रंथालये बंद ठेवण्यात आले होते.या मुळे बऱ्याच प्रमाणातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे  ग्रामीण,शहरी भागातील विद्यार्थी व अभ्यासिका मधे अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यास कसा करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.

तसेच या वर्षी होऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा व UPSC,MPSC परीक्षा,पोलीस भरती इत्यादी या पार्श्वभुमीवर अभ्यासिका सूरू करने अतिशय गरजेचे आहे.त्यामुळे योग्य नियोजन व काळजी घेत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करीत शहरातील सर्व शासकीय, खाजगी अभ्यासिका व ग्रंथालये त्वरित सुरु करावीत ,अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपुर तर्फे निवेदन स्वरुपात मा.आयुक्त साहेब, मनपा चंद्रपुर तसेच मा.राहुल पावडे, सभापती स्थायी समिती,मनपा चंद्रपुर यांना करण्यात आली. या वेळी अभाविप चंद्रपुर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले , महानगरमंत्री शुभम निंबाळकर , शैलेश दिंडेेवार , श्रेयस श्रीगडीवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here