भद्रावतीचे दोन विद्यार्थी आयआयटी साठी पात्र

0
1412
Advertisements

भद्रावती/ अब्बास अजानी

नुकत्याच जाहीर झालेल्या अभियांत्रिकी परीक्षेच्या निकालात भद्रावती येथील ग्लोरिअस अकादमीचे दोन विद्यार्थी आय.आय.टी.साठी पात्र ठरले आहेत.
तनुजा मंगेश तांडेकर आणि संस्कार सुशील ठेंगरे अशी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तनुजाचे वडील केबल आपरेटर आहेत,तर आई गृहिणी आहे.संस्कारचे वडील शिक्षक व आई गृहिणी आहे.हे दोन्ही विद्यार्थी येथील ग्लोरिअस अकादमीचे विद्यार्थी आहेत. ते आपल्या यशाचे श्रेय ग्लोरिअस अकादमीचे शिक्षक,व्यवस्थापक आणि आपल्या आई-वडीलांना देतात.त्यांनी अभियांत्रिकीच्या मेन्स आणि अॅडव्हान्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here