कोरोनामुक्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन प्लाझ्मा दान करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

0
143
Advertisements

चंद्रपूर: जिल्ह्यातील बरेच कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू पासून लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. अशा बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील  प्लाझ्मा इतर कोरोना बाधितांना जीवदान देवु शकतात. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या रुग्णांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन रक्तदान करून प्लाझ्मा दान करावा. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्तातुन प्लाझ्मा काढुन कोरोना बाधितांवर उपचार केल्या जातात.राज्यात प्लाझ्मा थेरपीने अनेक कोरोना बाधितांवर उपचार केलेले आहेत. त्यामुळे अशा बरे होणाऱ्या बाधितांची संख्या पण मोठी आहे.

Advertisements

शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यामुळे कोरोनावर लवकर मात केली जाऊ शकते. ही अँटीबॉडीज अर्थात रोग प्रतिकार शक्ती कोरोना विषाणूला मारण्यासाठी कार्य करीत असते. ही अँटीबॉडीज तयार होण्यासाठी उपचारातून बरे झालेल्या बाधितांनी रक्तातील प्लाझ्मा महत्त्वाची भूमिका बजावत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here