राजुरा – मध्य चांदा वनविभागातील राजुरा आरटी 2 भागात वाघांची दहशत सुरू आहे.
या वाघाने आजपर्यंत 10 लोकांची शिकार केली आहे. वाघाला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे लावण्यात आले आहे परंतु हा वाघ पिंजऱ्यात येत नसल्याने वनविभागाला अपयश येत आहे.
जर तो पिंजऱ्यात येत नसेल तर त्याला गोळी घाला असा ईमेल शेतकरी संघटनेने वनमंत्री राठोड यांना दिला आहे.
राजुरा, विरुर व लाठी क्षेत्रात वाघाने आतापर्यंत 20 ते 30 जनावरे व 10 मनुष्याची शिकार केली, हे हल्ले शेतकऱ्यांवर होत असून सध्या हंगामाची वेळ असून शेतकरी वाघाच्या दहशतीने शेतात पण जाणार नाही का असा प्रश्न शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांनी वनविभागाला केला आहे.
नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी वनविभाग अपयशी होत असून त्या वाघाला गोळी घालण्याची परवानगी देण्यात यावी.
याआधी सुद्धा अनेक नरभक्षी वाघांना प्रशासनाने गोळी मारली आहे तर या वाघाला सुद्धा गोळी घाला असा ईमेल आमदार चटप यांनी वनमंत्र्यांना केला आहे.