Advertisements
प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने जिल्ह्यातील आठवडी बाजार प्रशासनाने बंद केले मात्र घुगूस शहरात आजही रविवारला आठवडी बाजार भरत असतो.
विशेष म्हणजे रविवारी भरणाऱ्या ह्या बाजारात भाजी विक्रेते चंद्रपूर शहरातील आहे.
स्थानिक भाजी विक्रेत्यांना मात्र आठवडी बाजार भरण्यासाठी मनाई आहे परंतु बाहेरचे विक्रेते येऊन भाजीबाजार लावून जातात .
स्थानिक भाजीविक्रेत्यांनी आम्हाला पण आठवडी बाजार लावण्यात परवानगी देण्यात यावी या आशयाचे निवेदन घुगूस ग्राम पंचायत ला देण्यात आले.
स्थानिक भाजी विक्रेत्यांना डावलून आम्हाला उपाशी ठेवून बाहेरच्यांना तुपाशी ठेवण्याच काम प्रशासन करीत आहे असा आरोप स्थानिक भाजी विक्रेत्यांनी लावला आहे, जर त्यांचा आठवडी बाजार बंद केला नाही तर आम्ही त्यांना बसू देणार नाही असा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला आहे.