विक्की गुप्ता/प्रतिनिधी
घुग्घुस :- सिने अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला घेऊन हेतुपूर्वक व राजकिय आकसापोटी रिपब्लिकन टीव्हीचे प्रतिनिधी अर्णब गोस्वामी यांने वारंवार खोट्या, भ्रामक उत्तेजक बातम्या प्रसारीत केल्या महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून रात्र – दिवस कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या जीवाची व कुटुंबाची तमा न बाळगता जनरक्षकांच्या भूमिकेत जीवाचे रान करणाऱ्या मुंबई पोलीस बांधवाची प्रतिमा मलिन करण्याचा कार्य सातत्याने अर्णब गोस्वामी यांनी केले आहे.
तब्बल चार महिने संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी कधी सुशांत सिंग तर कधी कंगना राणावत यांच्या माध्यमातून याने जहरिली गरळ ओकली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्या मेडिकल टीमने वैदकीय तपासणी नंतर हे आत्महत्या असल्याचे जाहीर केले
तसेच केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)ने आपल्या तपासणी व क्राईम सीन रीक्रीएट नंतर परिस्थिती व पुराव्या आधारे हे आत्महत्याच असल्याचा दुजोरा दिला आहे.
करिता महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या रिपब्लिकन टिव्ही वर व प्रतिनिधी गुन्हा नोंद करून कारवाई करावी या मागणीसाठी संजीवनी बहूउद्देशीय संस्थेच्यावतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिनांक 08 ऑक्टोबर रोजी घुग्घुस ठाणेदार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजुरेड्डी, उपाध्यक्ष सय्यद अनवर, माजी उपसरपंच नकोडा हनिफ शेख, संजय कोवे, देवानंद ठाकरे,संपत कोंकटी हे उपस्थित होते.