सरकारचे शेतकऱ्यांसोबतचे प्रेम “पुतना-मावशी” सारखे….!

0
264
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
केन्द्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बांधव दलालांच्‍या तावडीतून मुक्‍त होणार असून स्वकष्टाने पिकविलेल्या मालाची विक्री व बाजारपेठेत स्‍वातंत्र्य मिळणार असून कुठल्‍याही परिस्थितीत एमएसपी बंद होणार नसल्‍याचे पंतप्रधानांनी स्‍पष्‍ट केले.या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार आहे.मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यां विषयी “पुतना-मावशी” चे प्रेम दाखवत या कायद्याला स्थगिती दिली आहे.ही स्थगिती त्‍वरीत उठवावी व राज्‍यात केंद्राच्‍या या कायद्याची अंमलबजावणी करावी,या मागणीसाठी सदर निषेध आंदोलन येत असल्याचे प्रतिपाद कोरपना तालुका भाजपाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांनी कोरपना येथील बसस्टॉप येथे महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आंदोलना दरम्यान केले.
“किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में,स्‍थगिती रद्द करा शेतक-यांना न्‍याय द्या, महाविकास आघाडीचे प्रेम हे “पुतना-मावशीचे प्रेम,कृषी विधेयकाची राज्‍यात अंमलबजावणी करा,महाविकास आघाडी नव्‍हे तर महाबिघाडी” अशा घोषणांचे फलक फडकावत राज्‍य सरकारचा निषेध केला.सदर आंदोलन हे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्‍या नेतृत्‍वात घेण्यात आला.यावेळी संजय मुसळे,पुरूषोत्तम भोंगळे,अरूण मडावी,किशोर बावणे, निलेश ताजने,रमेश मालेकर,अरूण डोहे, हरीभाऊ घोरे,अमोल आसेकर,संदीप शेरकी,शशीकांत आडकीने,ओम पवार, दिनेश खडसे,विनोद नवले,पद्माकर दगडी,विनोद कुमरे,तुळशीराम डोहे आदींची उपस्थिती होती.शिष्टमंडळाद्वारे मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले.आंदोलकांच्‍या भावना शासनापर्यंत पोहचविण्‍याचे आश्‍वासन तहसीलदार यांनी शिष्‍टमंडळाला दिले.कोरोनामुळे संपूर्ण आंदोलनात शासन नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here