2 लाख 80 हजारांची देशी दारू जप्त

0
591
Advertisements

भद्रावती – अंधाराचा फायदा घेत दारू तस्करी करणाऱ्यावर भद्रावती गुन्हे शाखेने कारवाई करीत 6 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर वरून दारूसाठा येत असल्याची माहिती भद्रावती गुन्हे शाखेला मिळाली असता त्यांनी भद्रावती मुख्य मार्गावर नाकाबंदी केली असता रात्री 12 वाजता संशयित इंडिका विस्टा गाडी येत असल्याने ते वाहन थांबवित चौकशी केली असता त्यामध्ये बसलेले 2 इसम हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
गाडी क्रमांक एम एच 04 डि वाय 1548 मध्ये 2 लाख 80 हजारांची देशी दारू व गाडी असा एकूण 6 लाख 80 हजारांचा मुद्देमाल भद्रावती पोलिसांनी जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here