गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर भाजपाचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार हे कोरोनावर यशस्वी मात करून 7 आक्टोंबर रोजी आपल्या घरी सुखरूप परतले.शहरात आगमन होताच चाहत्यांनी त्यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत केले.उपलेंचीवार यांनी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतत जनतेच्या सेवेत राहुन मदतीचा हात दिला.गोरगरीब गरजूंना धान्य कीट,मास्क,सॅनिटायजर अशा वस्तुंचे मोठ्याप्रमाणात वाटप केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे विविध जनहिताची कामे करताना दुर्दैवाने यांना कोरोनाची लागण झाली.रिपोर्ट पाझेट्यू आल्याने लगेच त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.
“समस्त मित्र मंडळी,गोरगरीब जनतेचे प्रेम माझ्या पाठीशी असल्याने ईश्वराने मला कोरोनाशी लढायला हिम्मत दिली आणि आज मी सर्वांच्या आशिर्वादाने सुखरूप घरी परतलो” असे भावनिक मत सतीष उपलेंचीवार यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी भाजप नेते संजय मुसळे,माजी नगरसेवक निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी,भास्कर उरकुडे,विशाल राव,अजी़म बेग,शंकर आपूरकर,उपलेंचीवार सर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष उपलेंचीवारांची कोरोनावर यशस्वी मात
Advertisements