हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ जनाक्रोश धरणे

0
320
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर येथील विविध राजकीय, सामाजिक, विद्यार्थी, धार्मिक संघटनांचा विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात उत्तर प्रदेश येथील हथरस येथील मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कार व अत्याचार प्रकरणात तीव्र निषेध करण्यासाठी जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.व कँडल लावण्यात आल्या या वेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधी यांनी आपले निषेध नोंदवत पीडित मुलीची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे,उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे,पीडितेच्या कुटुंबाला केंदीय दलाची सीआरपीफ सुरक्षा प्रदान करावी,आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी,इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

जनाक्रोश धरणा आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ.राकेश गावतुरे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रतीक डोरलीकर, रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशनचे राजस खोब्रागडे, लुम्बिमी गणवीर,जाम. विवेक बांबोडे, भीम आर्मीचे सुरेंद्र रायपुरे ,बी आर स पी चे मोंटो मानकर,    डॉ. अभिलाषा गावतुरे, वंचित आघाडीचे फिरोजखान पठान, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धीरज तेलंग, एम आय एम चे सोहल, वाल्मिकी समाजाचे राकेश खोटे,बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन चे राजकुमार जवादे, ओबीसी समाजाचे बळीराज धोटे,विजय मुसळे,योगेश आपटे यांची प्रामुख्याने उपस्तीथी होती.
अनेक घोषणांनी चंद्रपूर शहर या वेळेस दुमदुमून गेले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here