नात्याला काळिमा फासणाऱ्या त्या नराधमाला कठोर शिक्षा द्या – भारती दुदानी

0
300
Advertisements

चंद्रपूर – बलात्काराच्या घटनेत आरोपीना तात्काळ कठोर शिक्षेचं प्रावधान करायला हवं, तेव्हाच देशात अश्या प्रकारच्या घटनांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा महिला संघटिकाभारती दुदानी यांनी दिली आहे.

चंद्रपूर शिवसेना महिला जिल्हासंघटिका डाँ भारती ताई दुदानी यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेऊन गोंडपिपरी तालुक्यातीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ कठोर शिक्षा करा असे निवेदन दिले आहे.

Advertisements

येनबोथला येथे 2 ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर चुलत काकानेच अत्याचार करून कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासली.या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवसेना महिला जिल्हासंघटिका भारती ताई दुदानी यांच्या नेतृत्वात, उपजिल्हा संघटिका मायाताई पटले, शहर संघटिका वर्षाताई कोठेकर, शोभाताई वाघमारे व जिल्हा शिवसेना महिला आघाडी चन्द्रपुर तर्फे, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना निवेदन दिले व अत्याचार करणाऱ्या नराधम काकाला तात्काळ कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here