तिघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन

0
217
Advertisements

ब्रम्हपुरी :भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने आज येथील शिवाजी महाराज चौकात विविध माग्णांसाठी महाराष्ट्र राज्यातील तिघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करत ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून केंद्र सरकारच्या व मागील भाजपा शासनाच्या काळातील निर्णय व विविध योजनांना स्थगिती देण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात कृषी विधेयक २०२० बहुमताने पारित केले. सदर विधेयक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या विधेयकाने शेतकऱ्यांची दलालांपासून मुक्तता होणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा लाभ मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार. परंतु शेतकऱ्यांप्रति बेगडी प्रेम असेलेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदर विधेयक महाराष्ट्र राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी व्हावी या करिता आज भाजपा ब्रम्हपुरीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोबतच तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ही पाठविण्यात आले.

Advertisements

या आंदोलना प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, तालुका महामंत्री तथा जि.प सदस्य क्रिष्णा सहारे, शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुद्धे, नगरसेविका सौ.पुष्पा गराडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव लांजेवार, युवा मोर्चा शहर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, जेष्ठ कार्यकर्ते सुधीर सेलोकर, अशोक तुडूंलवार, साकेत भानारकर, अरविंद कुंभारे, बाळू काळीकर, रेहमान खान पठाण, अरुण भगत, सुरेश बनपूरकर, माजी नगरसेविका अनघा दंडवते, मंजिरी राजणकर, रेखा राऊत, प्रतिभा धोटे, रितू सेठीये यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here