मनोज अधिकारी हत्याकांडातील ती सौंदर्यवती कुठे झाली बेपत्ता?

0
861
Advertisements

चंद्रपूर – कांग्रेसचे युवा नेता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले मनोज अधिकारी यांच्या हत्याकांडाचा तिढा अजूनही कठीण होत चाललेला आहे.
या हत्याकांड प्रकरणातील ती सौंदर्यवती पोलिसांच्या हाती लागली नाही.
हे प्रकरण आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वळत करण्यात आले असून आता सर्व पुरावे व लहान बाबीवर पोलीस पुन्हा लक्ष केंद्रित करीत आहे.
आरोपी बैरागी यांचे घरून अधिकारी यांचा मोबाईल व पैश्याची देवाणघेवाणीचा करारनामा पोलिसांच्या हाती लागला आहे.
मात्र आरोपी बैरागी हा आपले बयान वारंवार बदलत आहे, या हत्याकांडातील त्या सौंदर्यवतीचे कनेक्शन काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
जोपर्यंत ती पोलिसांच्या हाती लागणार नाही तोपर्यन्त हे हत्याकांड कोणत्या कारणावरून झाले हे स्पष्ट होणार नाही.

सध्या यामध्ये एक महत्वाची बाब समोर आली आहे त्या सौंदर्यवती महिलेने आपलं सोशल मीडिया अकाउंट लॉक करून ठेवले आहे. या हत्याकांडानंतर ती महिला सोशल माध्यमावर सक्रिय होऊन स्वतःच प्रोफाइल लॉक केलं का? याचा तपास सुद्धा सुरू आहे.

Advertisements

आज आरोपींच्या पोलीस कोठडीची तारीख संपणार आहे, पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करणार की आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करणार हे तर आज कळेल.
मृतक मनोज अधिकारी यांच्या समर्थनात हजारोंच्या संख्येने कँडल मार्च काढून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here