चंद्रपूर – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर वाहतूक विभाग सज्ज झाले आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या संकल्पनेतून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस निरीक्षक यादव यांनी शहरातील ऑटोचालकांची बैठक घेत या मोहिमेची माहिती दिली.
पुढील २ दिवस ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालून प्रवास करावं व ऑटोत बसणाऱ्या प्रवाश्याना सुद्धा मास्क असल्याशिवाय ऑटोत बसू देऊ नये. अशी सूचना वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे. प्रवाश्याना मास्क लावणे बंधनकारक करण्यात यावे व जे या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निर्देश आहे. या मोहिमेला ऑटो चालकांनी सकारत्मक प्रतिसाद दर्शवला आहे.
आधीच कोरोनामुळे ऑटो चालकांचे कंबरडे मोडले आहे, त्यांना घर चालविणे सुद्धा आज अवघड जात आहे या परिस्थितीत सुद्धा आता मास्क न घालणारे प्रवासी याना ऑटोत बसविण्यास मज्जाव करण्याचे आदेश यामुळे ऑटो चालकांचे नक्कीच आर्थिक मनोधैर्य खचेल. नागरिकांनी स्वतः कोरोना काळातील नियम पाळणे बंधनकारक आहे, नियम न पाळल्यास ५०० रुपयापर्यंतचा अनेकांना दंड ठोठाविण्यात आला आहे.
आज ऑटोचालकांना सवारी मिल्ने कठीण झाले आहे, कोरोनाच्या भीतीने नागरिक ऑटो मध्ये बसण्यास घाबरत असताना पोलीस प्रशासनाने असा नियम लावणे कितपत योग्य आहे? हे तर २ दिवसांच्या मोहिमेत कळणारच.