अखेर…! बोरकर यांच्या उपोषणाला यश

0
290
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मुमताज अली
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच लहान मोठे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर हे गेल्या 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषद समोर अन्नत्याग उपोषणाला बसले होते.अनेक घडामोडी नंतर आज सातव्या दिवशी शासनाला जाग आली आणि सखोल व निष्पक्ष चौकशीचे आदेश चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी दिले.चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजूरा यांना नियुक्त करण्यात आले असून यासंबंधीचे पत्र नायब तहसीलदार यांनी उपोषणकर्ता बोरकर यांना दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी सदर घनकचरा व्यवस्थापन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश द्यावे यासाठी बोरकर यांनी उपोषण पुकारले होते,उशीरा का होईना अखेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केल्याने मी समाधानी आहे.मात्र सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा बोरकर यांनी News34 ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
या अन्नत्याग उपोषणाला शिवसेना, भाजपा नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्यांनी तसेच कवाडे व आठवले गटांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन मला यश मिळवून दिले, त्याचबरोबर शेख अमजद(अमजू भाई)यांनी मला उपोषणासाठी जागा उपलब्ध करून दिली.तसेच सतत 7 दिवस उपस्थित राहून याठिकाणी घडणाऱ्या एकुण एक घडामोडींना आपल्या लेखनीतून वाचा फोडली असे आमचे मित्र पत्रकार मूम्ताज़ भाई व News34 चॅनल,यासर्वांना मी मनाच्या अंतकरणातून धन्यवाद देतो,आभार मानतो असे मत मदन बोरकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.आता मात्र सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणार का ? चौकशीला कीती दिवस लागतील आणि अहवाल काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here