योगी सरकार मुर्दाबाद चे चंद्रपूर शहरात लागले नारे

0
242
Advertisements

चंद्रपूर – हाथरस येथे 19 वर्षीय मुलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराविरोधात चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने जोरदार निदर्शने करीत आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शने आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात महिला जिल्हा संघटिका भारती दुदानी यांनी हाथरस घटनेचा निषेध करीत आरोपींना तात्काळ फासावर लटकवायला हवे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
महिला आघाडीच्या मनस्वी गिर्हे यांनी या घटनेनंतर योगी सरकारला जाग आली नाही, इतकेच नव्हे तर त्यांनी पीडितेचा मृतदेह मध्यरात्री जाळून टाकला, अश्या अमानवीय प्रवृत्तीला सहकार्य करण्याचे काम योगी सरकारने केले आहे.
आयोजित आंदोलनात महिला उपजिल्हाप्रमुख माया पटले, शहर प्रमुख वर्षा कोठेकर, कुसुम उदार, शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे, विक्रांत सहारे आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here