Advertisements
प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – स्थानिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वर्धा नदी पात्राजवळ वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करीत पोलिसांनी 10 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात मोठ्या संख्येत वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे.
महसूल विभाग, खनिकर्म विभाग डोळे झाक करीत या वाळू चोरीला जणू प्रोत्साहन देत आहे.
तहसील प्रशासनाने कारवाई न करता चक्क पोलीस प्रशासनाने कारवाई कारण म्हणजे कुठे तरी काही गडबड आहे.
या धाडीत महेश कामतवार, मारोती मोहूर्ले यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर मालक पिंटू लोंढे व विजय सिंग सध्या फरार आहे.
पोलिसांनी 2 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली व 2 ब्रास रेती जप्त केली असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.