चंद्रपूर – 30 सप्टेंबरला कांग्रेसचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते मनोज अधिकारी यांची कुऱ्हाडीने त्यांच्या सिनर्जी वर्ल्ड येथील फ्लॅट मध्ये हत्या करण्यात आली होती.
या हत्येची माहिती संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली असता शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तनावावर नियंत्रण करण्यात आले.
या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, नगरसेवक अजय सरकार, रवी बैरागी व धनंजय देबनाथ हे अटक झालेल्या आरोपींची नावे मात्र या प्रकरणात अजूनही 1 महिला आरोपी फरार आहे.
5 ऑक्टोम्बरला मनोज अधिकारी मित्र परिवारातर्फे बंगाली कॅम्प परिसरात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हजारो नागरिकांनी या मार्च मध्ये सहभाग घेतला, आम्हाला न्याय हवा असे फलक हातात घेत नागरिकांनी बंगाली कॅम्प परिसरात परिक्रमा केली.
माझ्या परिवाराला न्याय हवा आहे अशी आर्त हाक मृतक मनोज यांच्या मुलीने यावेळी केली.
मनोज अधिकारी हे काली माता मंदिर समितीचे अध्यक्ष सुद्धा होते, परिसरात कुणाही नागरिकांना समस्या असली की मनोज हे मदत करायला नेहमी धावून जायचे, 2 महिण्याआधी त्यांनी परिसरातील नागरिकांसाठी एम्बुलेन्सचे लोकार्पण केले होते.
त्यांच्या नृशंस हत्येविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
माझ्या परिवाराला न्याय द्या – मृतक मनोज अधिकारी यांच्या मुलीची आर्त हाक
Advertisements