आज जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 100 च्या आत

0
1159
Advertisements

कोरोना बातमीपत्र

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 11118 झाली आहे. यापैकी 7671 बाधित बरे झाले आहेत तर 3273 जण उपचार घेत आहेत.

Advertisements

सोमवारी एकूण 92 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये रामपूर, राजुरा येथील 55 वर्षीय पुरुष, नगीनाबाग, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष, नेहरूनगर, चंद्रपूर येथील 57 वर्षीय पुरुष, हनुमाननगर, ब्रह्मपुरी येथील 52 वर्षीय महिला, नगीनाबाग, चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला, मुक्ती कॉलनी परिसर, चंद्रपूर 78 वर्षीय पुरुष, विश्वकर्मा नगर, भद्रावती येथील 68 वर्षीय पुरुष बाधितांचा मृत्यू झाला मृतक बाधितांला कोरोनासह, उच्चरक्तदाब, न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 165 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here