चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व निवेदन देण्यात आले.
गोंडपीपरी तालुक्यातील येनबोथला येथे 2 ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर चुलत काकानेच बलात्कार करून कौटुंबिक नात्यालाच काळिमा फसला ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे .
दुर्घटनेच्या दिवशीच मुलीचे आजोबाचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपल्या नंतर पाहुण्यांचे जेवण
सुरू असतांना मद्यधुंद व हैवानियत विकृत मानसिकतेत असलेला कमलाकर राऊत कुटुंबातील वयोवृद्धाचे निधन झाल्याचे दुःख व चिंता असतांना स्वतःच्या चुलत काकानेच पुतणीवर बळजबरी बलात्कार करून अजून संकट व चिंतेच्या खाईत परिवाराला ढकलले आहे.
अंगावर काटे आणणारी ही घटना आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक अरविंद साळवे साहेब यांना निवेदन दिले व बलात्कार करणाऱ्या नराधम काकावर तात्काळ कठोर शिक्षा करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हासचिव लता जांभूळकर सरस्वती गावंडे माधुरी पांडे मूल तालुका अध्यक्ष अर्चना चावरे प्रमिला पाठक नीता पीपळसेंडे गायत्री मेसराम नीलिमा नरवडे व अन्य महिला उपस्थित होत्या.
त्या नराधमावर कठोर कारवाई करा – बेबीताई उईके
Advertisements