गडचांदूर येथे कोविड उपचार केंद्राची निर्मिती करावी

0
186
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा तांडव सुरूच असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्याच्या ठिकाणी जर कोविड केअर सेंटरची निर्मिती केल्यास परिसरातील नागरिकांना वेळेवर आणि योग्य उपचार उपलब्ध होणार यात दुमत नाही.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात ओद्योगिक नगरच्या नावाने जगप्रसिद्ध गडचांदूर शहर व परिसरात तीन सिमेंट कंपन्या अस्तित्वात आहे.याठिकाणी स्थानिकांसह इतर राज्यातील शेकडो कामगार काम करतात.तालुक्यातील लोकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने CSR फंडाचा वापर करून कोविड उपचार केंद्र उभारून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी स्वत: सिमेंट कंपन्यांनी पाऊले उचलावी.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून तालुक्याच्या ठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरु झाल्यास नागरिक व प्रशासनाला मोठा दिलासा मिळेल या करीता संबंधितांनी विचार करून लवकरात लवकर गडचांदूर शहरात कोविड उपचार केंद्राची निर्मिती करावी अशी मागणी मयुर एकरे,अतूल गोरे,सागर चौधरी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here